---Advertisement---
जळगाव : सोन्यासह चांदीच्या भावात वाढ झाली असून, जळगाव सुवर्णपेठेत चांदीच्या भावात एक हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख १५ हजार रुपयांवर पोहोचली आहे. तर सोन्याच्या भावात ७०० रुपयांची वाढ होऊन ते ९९ हजार ७०० रुपयांवर पोहोचले आहे.
१९ जुलै रोजी एक लाख १३ हजार रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात २० रोजी ५०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख १३ हजार ५०० रुपयांवर पोहोचली. २१ रोजी याच भावावर स्थिर राहिल्यानंतर एक हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख १५ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. दुसरीकडे, १९ जुलै रोजी ९८ हजार ५०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात २० रोजी ५०० रुपयांची वाढ होऊन २१ रोजी याच भावावर स्थिर राहिल्यानंतर त्यात ७०० रुपयांची वाढ झाली आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,०१,४५० रुपये, तर २२ कॅरेट सोने ९३,०१० रुपये दराने आणि १८ कॅरेट सोने ७६,१०० रुपये दराने विकले जात आहे.
आर्थिक राजधानी मुंबई तसेच चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबादमध्ये २४ कॅरेट सोने १,०१,३०० रुपये दराने,
तर २२ कॅरेट सोने ९२,८६० रुपये दराने आणि १८ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ७५८९० रुपये दराने विकले जात आहे. दरम्यान, चांदीच्या किमतीत थोडीशी वाढ झाली असून, आज चांदी १,१८,१०० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.