---Advertisement---
---Advertisement---
जळगाव : शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादातून दोन तरुण एकमेकांना भिडले, त्याचे रुपांतर हल्ल्यात झाले आणि यात एकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घलडी आहे. दोन तरुणांमध्ये वाद इतका विकोपाला गेला होता की, दोघांनी धारदार शस्त्राने एकमेकांवर वार केले. धीरज दत्ता हिवराळे (वय २७) असे मृत तरुणाचे, तर कल्पेश वसंत चौधरी (वय २५) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
पोलीस सूत्रानुसार, या दोन तरुणांमध्ये जुना वाद होता. दरम्यान, आज सम्राट कॉलनी परिसरात दोघे एकमेकांसमोर आल्याने त्यांच्यात पुन्हा वाद झाला. या वादातून दोघे एकमेकांना भिडले, त्याचे रुपांतर हल्ल्यात झाले. वाद इतका विकोपाला गेला होता की, दोघांनी धारदार शस्त्राने एकमेकांवर वार केले.
या हल्ल्यात धीरज याच्या छातीत खोलवर वार झाल्याने तो जागीच बेशुद्ध पडला. स्थानिकांनी तातडीने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्याला मृत घोषित केले. तर कल्पेश याच्या डोक्यावर आणि मानेवर गंभीर जखमा झाल्या असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे.
नातेवाईकांचा आक्रोश
घटनेची माहिती कळताच नातेवाईक आणि मित्रांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. मयताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोश केला होता. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचा सखोल तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच, नागरिकांनी शांतता राखावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.