---Advertisement---

Hatnur Dam : हतनूर धरणाचे २२ दरवाजे खुले; काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

---Advertisement---

---Advertisement---

भुसावळ : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाची जलपातळी झपाट्याने वाढत आहे. यामुळे धरणाचे २२ दरवाजे खुले करण्यात आले असून, काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरणातील पाण्याची पातळी २१०.६९० मीटरवर पोहोचली आहे. पूर्णक्षमतेची पातळी २१४.०० मीटर आहे. सध्या धरणात २२१.६० दशलक्ष घनमीटर (५७.११ टक्के) इतका एकूण पाणीसाठा झाला आहे. धरणाचे दरवाजे प्रत्येकी १ मीटरने उघडण्यात आले आहे. पाण्याचा विसर्ग तापी नदीच्या पात्रात सुरू करण्यात आल्याने नदी दुथडी भरुन वाहत आहे.

कालव्यांमध्ये सुरु धरणातून विसर्ग

धरणाशी जोडलेल्या भुसावळ, यावल, रावेर, चोपडा तालुक्यातील कालव्यांमध्ये २.८३ क्युमेसेक्स (१०० क्यूसेक्स) इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण क्षेत्रात काल दिवसभरात ४ मिमी पावसाची नोंद झाली असून, यंदा एकूण पावसाचा आकडा २३१ मिमीपर्यंत पोहोचला आहे.

गाळयुक्त पाणीपुरवठ्याची शक्यता

भुसावळ तालुक्यात गाळयुक्त पाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासंदर्भात दक्षता बाळगण्याची गरज आहे. दरम्यान, आवश्यक उपाययोजना राबवण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---