---Advertisement---
---Advertisement---
Crop Insurance Scheme : खरीप हंगामासाठी लागू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेवटचे चार दिवस बाकी आहे. शेतकऱ्यांनी ३१ जुलै पूर्वी पीक विमा हप्ता भरून योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
योजनेत पीक विमा भरण्याची अंतिम मुदत ३१ अशी असून यामध्ये कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेवटच्या दिवसाची वाट न बघता पिकविमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
चार प्रकल्प झाले ‘ओव्हरफ्लो’
धुळे : जिल्ह्यात काही दिवसांपासून दमदार पावसाला सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील १२ पैकी ४ धरण ओव्हरफ्लो झाले आहे. सुलवाडे ३० तर अक्कलपाडा प्रकल्प ८२ टक्के भरल्याने टप्या टप्यात पांझरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गत वर्षांपेक्षा यंदा पहिल्यांदाच चार प्रकल्प जुलैअखेरपर्यंत शंभर टक्के क्षमतेने भरल्याने पाणी टंचाई जाणवणार नाही अशी स्थिती आहे.
जिल्ह्यातील १२ मध्यम व ४५ लघु प्रकल्पांची क्षमता ४९४.८६ दशलक्ष घनमीटर पाणी एवढी आहे. जून महिन्यापासून साक्री तालुक्यात संततधार पाऊस सुरू असल्याने दीड महिन्यात मालनगाव व जामखेली आणि अक्कलपाडा धरण भरले होते. तर काही प्रकल्पातील जलसाठा वाढू लागला आहे.