---Advertisement---
---Advertisement---
जळगाव : पाणी भरण्यासाठी मोटर सुरु करत असताना विजेचा झटका लागून २५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भुसावळच्या वांजोळा येथे ही घटना घडली. दीपाली चेतन तायडे (वय २५) असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, मयत महिलेच्या माहेरच्या मंडळींनी सासरच्या मंडळींवर घातपात केल्याचा संशय व्यक्त केला असून, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील वांजोळा येथे दीपाली तायडे या वास्तव्याला होत्या. दरम्यान, सकाळी पाणी भरण्यासाठी मोटर सुरु करत असताना, त्यांना विजेचा झटका लागला आणि खाली कोसळल्या.
हा प्रकार नातेवाईकांना लक्षात येताच त्यांनी तात्काळ धाव घेत दीपालीला भुसावळ खासगी रुग्णालयात दाखल नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली.
याबाबत माहिती मिळताच माहेरच्या मंडळींनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेत आक्रोश केला. यावेळी आमच्या मुलीचा मृत्यू आकस्मिक नव्हे, तर घातपात झाल्याचा आरोप त्यांनी केला. महिलेच्या पश्चात पती, चार वर्षांचा मुलगा आणि दोन वर्षांची मुलगी असा परिवार आहे.