---Advertisement---
जळगाव : रावेर तालुक्यातील एका गावातील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला काही तरी फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपी राज्या सोन्या बारेला (वय २९) यास पोलिसांनी माळशिरस, ता अकलूज, जि. सोलापूर येथील उसमळ्यातून नुकतेच ताब्यात घेतले आहे.
रावेर तालुक्यातील एका गावातील १२ वर्षाची अल्पवयीन मुलीला इसमाने पळवून नेल्याची घटना २६ मार्च रोजी घडली होती. रावेर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संबंधित मुलीच्या पालकांकडे तिचा फोटो नव्हता. तसेच आरोपीही अज्ञात होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून राज्या सोन्या बारेला (वय २९, रा. केहऱ्हाळे) याला माळशिरस येथील उसमळ्यातून अटक केली. तो तेथे ऊसतोड मजुरांसह राहत होता.
ही कारवाई पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार महेंद्र महाजन, पोहेकॉ विष्णू भिल, पोकों सचिन घुगे, पोकों नितीन सपकाळे, पोकों उज्ज्वला पवार यांनी केली. या मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
पाच दिवसांची कोठडी
आरोपी चार महिन्यांपासून अल्पवयीन पीडितेला घेऊन तेथे राहत होता. आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. तसेच आरोपीला भुसावळ सत्र न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.
---Advertisement---