---Advertisement---
---Advertisement---
Gold Rate Today : आज ३० जुलैला सकाळच्या सत्रात सोने दरात वाढ दिसून येत आहे. तसेच चांदीच्या दरातही वाढ झाली असून, दागिने खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहे. सोन्याच्या किमतीत ६०० रुपयांची वाढ झाली आहे. तर, चांदी १,१५,९०० रुपये प्रति किलो आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्ली, जयपूर, अहमदाबाद आणि पटना मध्ये २४ कॅरेट सोने १,००,६३० रुपये प्रति १० ग्रॅम दराने आहे, तर आर्थिक राजधानी मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता मध्ये २४ कॅरेट सोने १,००, ४८० रुपये दराने आहे.
त्याचप्रमाणे, दिल्ली, जयपूर, अहमदाबाद आणि पटना मध्ये २२ कॅरेट सोने ९२,२५० रुपये प्रति १० ग्रॅम दराने आहे, तर मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता मध्ये २२ कॅरेट सोने ९२, १०० रुपये दराने आहे.
काय आहे कारण
अमेरिकेतील व्यापार करार आणि जागतिक आर्थिक घडामोडींमुळे सोने आणि चांदीच्या किमतीत हा बदल दिसून येत आहे. याशिवाय, गुंतवणूकदार मध्यवर्ती बँकांच्या चलनविषयक धोरणांवरही लक्ष ठेवून आहेत, ज्यामुळे बाजारात अस्थिरता असल्याचे मत बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.