---Advertisement---
---Advertisement---
Ladki Bahin Yojana installment : मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अर्थात जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी निधी वर्ग करण्यात आला आहे. याबाबत राज्य महिला व बालविकास विभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी महिलांच्या खात्यात जुलै महिन्याचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे.
खरं तर आज जुलै महिन्याचा शेवटचा दिवस असून, या महिन्याचा हप्ता अद्यापही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे याकडे सर्व पात्र महिलांचे लक्ष लागले होते.
जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 2984 रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास विभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी महिलांच्या खात्यात जुलै महिन्याचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, आज जुलै महिन्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आता पुन्हा ऑगस्टच्या हप्त्याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, याच जुलै-ऑगस्ट असे दोन महिन्यांचे मिळून ३००० रुपये एकत्रच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मात्र ते पैसे नेमक कधी येणार याची अधिकृत तारीख अद्याप समोर आलेली नाही. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच हे पैसे जमा होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे जत असे झाल्यास महिलांना ३०००रुपये एकत्र मिळणार असून, त्यांचा राखीचा सण चांगलाच आनंदात जाईल, असे सांगितले जात आहे.