Malegaon Bomb Blast Case : साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

---Advertisement---

 

Malegaon Bomb Blast Case : १७ वर्षांपूर्वी झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी आज न्यायालयाने मोठा निर्णय दिला. या प्रकरणात न्यायालयाने सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. महत्त्वाचे पुरावे आणि पंचनामा व्यवस्थित झाला नसल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याचे न्यायालयाने म्हट्ले आहे.

याप्रकरणी भाजपाच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय यांच्यासह अनेकांवर आरोप लावण्यात आले होते. या बॉम्बसफोट प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. या प्रकरणात न्यायालयाने सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. महत्त्वाचे पुरावे आणि पंचनामा व्यवस्थित झाला नसल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याचे न्यायालयाने म्हट्ले आहे.

न्यायालयाने म्हटले आहे की, दहशतवादाला कोणताही रंग किंवा धर्म नसतो. मालेगावमध्ये स्फोट झाल्याचे सरकारी वकिलांनी सिद्ध केले, परंतु ते बाईकमध्ये बॉम्ब ठेवल्याचे सिद्ध करण्यात अपयशी ठरले.

या स्फोटात ६ जणांचा मृत्यू, तर १०० हून अधिक लोक जखमी झाले. संपूर्ण प्रकरणाचा प्रारंभिक तपास महाराष्ट्र एटीएसने केला होता. २०११ मध्ये हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले, सुमारे ५ वर्षांच्या तपासानंतर, एनआयएने २०१६ मध्ये आरोपपत्र दाखल केले.

एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज दिलेला निकाल ८ मे २०२५ रोजी सुनावण्यात येणार होता. मात्र, काही कारणांमुळे न्यायालयाकडून तो ३१ जुलैपर्यंत राखीव ठेवण्यात आला होता.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, एनआयए कोर्टातील इतर सर्व खटले आज पुढे ढकलण्यात आले आहेत. निकालापूर्वीच न्यायालयाने आदेशात म्हटले होते की आज सुनावणी होणारी सर्व प्रकरणे एकतर पुढे ढकलण्यात यावीत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---