---Advertisement---

शेतकऱ्यांना दिलासा! शासनाकडून नुकसान भरपाईची घोषणा

---Advertisement---

धुळे : फेब्रुवारी ते मे २०२५ या कालावधीत विशेषता एप्रिल आणि मे महिन्यात जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे. शासनाने १४ कोटी ९९ लाख ६२ हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली असून, ही रक्कम थेट बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

महसूल व वनविभागाच्या शासन निर्णयानुसार, राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाले, त्यात धुळे जिल्ह्याचाही समावेश आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील १५,९५७ शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळणार आहे.

जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठवलेल्या अहवालानुसार, एप्रिल २०२५ मध्ये धुळे जिल्ह्यात ६,६९६.२५ हेक्टर शेती क्षेत्रावर झालेल्या नुकसानीमुळे १२ हजार २१५ शेतकरी बाधित झाले असून, यासाठी ११ कोटी ४३ लाख ९ हजार रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे मे २०२५ मध्ये १,९६१.५३ हेक्टर क्षेत्रातील ३ हजार ७४२ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या स्वरूपात ३ कोटी ५६ लाख ५३ हजार रुपये वितरित करण्यात येणार आहेत. एकूण ८,६५७.७८ हेक्टरहून अधिक क्षेत्रातील १५ हजार ९५७ शेतकऱ्यांना १४ कोटी ९९ लाख रुपयांची मदत मिळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---