---Advertisement---
जळगाव : प्रेमासाठी अनेक महिलांनी आपल्या पतीला सोडून प्रियकरासोबत पळून जात लग्न केल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यात समोर आली असून, विवाहितेने तिचा ४ वर्षांचा मुलगा पहिल्या पतीकडेच सोडून देत नवीन संसार थाटला आहे. ही घटना पाचोरा शहरात घडली असून, या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
फुलविक्रेत्याकडे कामाला असलेल्या एका तरुणाचे फुलमाळा गुंफता गुंफता समोरच असलेल्या फळविक्रेत्या विवाहित महिलेवर प्रेम जडले. त्याने विवाहितेला पळवून नेत तिच्याशी लग्न केले. एवढेच नव्हे, तर त्या विवाहितेने तिचा ४ वर्षांचा मुलगा पहिल्या पतीकडेच सोडून देत नवीन संसार थाटला.
पाचोरा येथील चौकात एका फुलविक्रेत्याकडे हा तरुण कामाला होता. त्याचे समोरच असलेल्या फळविक्रेत्या विवाहित महिलेवर प्रेम जडले. दोघांनी गेल्या आठवड्यात पळून जात लग्न केले, त्यानंतर पोलिस स्टेशनला हजर झाले. मात्र, इकडे विवाहितेचा पती व ४ वर्षांचा मुलगा चिंतेत होते. पती लहान बाळासह पोलिस स्टेशनला हजर झाला.
यावेळी ‘झाले गेले विसरून जा’, असे सांगत त्याने सर्व मान्य करण्याची तयारी दर्शवली. मुलाने तर ‘आई, तू परत चल ना गं..’ अशी विनवणीही केली. मात्र विवाहिता अन्य तरुणाच्या प्रेमाच्या जाळ्यात पडली. लहानग्या मुलालाही सोडून ती दुसऱ्यासोबत रवाना झाली. ही घटना पाचोरा शहरात घडली असून, या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.