---Advertisement---

वृद्धाला आत्महत्येस प्रवृत्त केले ; तीन युवकांविरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय

---Advertisement---

जळगाव : रावेर शहरातील एका ७४ वर्षीय वृद्धाचा मोबाइलवर व्हिडिओ तयार करून त्यांच्या कुटुंबीयांना पाठवण्याची धमकी दिली. तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन युवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वृद्धाने दि. २९ जुलै रोजी स्वतःवर पेट्रोल टाकून जाळून घेतले. त्यांचा उपचारादरम्यान दि. ३ रोजी मृत्यू झाला.

संशयित आरोपी रोहित महेंद्र गजरे, जितेंद्र उर्फ भैया सुनील घेटे, सुमेध उर्फ चिकू बाळकृष्ण अटकाळे या युवकांनी व्हिडीओ कुटुंबीयांना पाठवण्याची वारंवार धमकी दिली. त्याला कंटाळून वृद्धाने युवकांना स्वतःचे बरे वाईट करतो, अशी धमकी दिली होती. त्यावर एका युवकाने यांना पेट्रोल दिले. आणि आत्महत्या करण्यास सांगितले.

यास कंटाळून अखेर वृद्धाने दि. २९ जुलै रोजी आंबेडकर नगरातील सामाजिक सभागृहाजवळ सायंकाळी चार वाजता आत्महत्येचा प्रयत्न केला.
जखमी वृद्धावर रावेर, बऱ्हाणपूर आणि जळगाव येथे उपचार करण्य आले. मात्र दि. ३ जुलै रोजी त्यांचा मृत झाला.

मयताच्या मुलाने याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्ष मीरा देशमुख, संतोष बिजागरे करत आहेत

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---