जळगाव : बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना अमळनेर तालुक्यात समोर आली आहे. एका नराधम पित्याने त्याच्या दहा वर्षीय अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अमळनेर पोलिसात वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, ती तिच्या आई वडिलांच्या घरी असताना ७ रोजी रात्री तिचा पती त्यांना भेटायला आला. तेव्हा तो मुलीसोबत अश्लील कृत्य करताना आढळला.
मुलीच्या आईने त्याला विरोध करून जाब विचारला. तेव्हा तिने आपण तिला घरी घेऊन जाणार असल्याचे सांगितले. मुलीच्या आईने पोलिसात जाण्याची धमकी दिली असता तो पळून गेला. याबाबत वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत.
दोन गटांमध्ये हाणामारी
अमळनेर : पूर्व वैमनस्यावरुन दोन गटात जोरदार हाणामारी होऊन तीन ते चार जखमी झाले. ही घटना झामी चौक व गांधलीपुरा भागात शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत काहींवर प्राणघातक शस्त्रांनी वार झाले आहेत.
दोन्ही गटातील जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काही अघटीत घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिस अधिकारी गांथलीपुरा पोलिस चौकीत ठाण मांडून होते. या घटनेची रात्री उशिरापर्यत पोलिसात नोंद झालेली नव्हती.