---Advertisement---
Gold Rate : गेल्या एका आठवड्यापासून सोन्याच्या किमतीत झपाट्याने वाढ होत होती. तथापि, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रुथ सोशल मीडियावरील एका घोषणेमुळे सोन्याच्या किमती अचानक १८०० रुपयांपेक्षा जास्त घसरल्या आहेत. अर्थात, ट्रम्प यांनी सोन्याला टॅरिफपासून दूर ठेवण्याची घोषणा केली आहे.
जळगाव मध्ये काय आहेत दर
जळगावमध्ये २४ कॅरेट सोने दरात ८०० रुपयाची घसरण होऊन विनाजीएसटी १००७०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. २२ कॅरेट सोने दरात ७०० रुपयांची घसरण होऊन ९२३१२ रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. दुसरीकडे चांदीचा दर ११५००० रुपये प्रति किलोवर आहे.
ट्रम्प यांच्या नवीन घोषणेमुळे एमसीएक्स सोन्याच्या किमतीत १.३८ टक्क्यांनी घट झाली आहे. यापूर्वी ९९९ शुद्धतेच्या सोन्याची किंमत १,०१,१९९ रुपये झाली होती. आता ही किंमत १,००,३८९ रुपये प्रति १० ग्रॅमवर घसरली आहे.
आतापर्यंत एमसीएक्सवर सोन्याची सर्वोच्च पातळी १,०२,२५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. म्हणजेच, या तुलनेत सोने १८६१ रुपयांनी स्वस्त झाले आहे.