---Advertisement---
जळगाव : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींची चौकशी करण्यात येत आहे. अर्थात एकाच कुटुंबात लाभ घेत असलेल्या दोनपेक्षा जास्त लाभार्थीचा शोध घेऊन निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींची चौकशी करण्यात येत असून, जळगाव जिल्ह्यातील ९२ हजार लाडक्या बहिणींची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
एकाच कुटुंबात लाभ घेत असलेल्या दोनपेक्षा जास्त लाभार्थीचा शोध घेऊन निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींची चौकशी करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील तब्बल ९२ हजार लाडक्या बहिणींची तपासणी करण्यात येणार आहे.
‘या’ लाडक्या बहिणींचा लाभ करण्यात येणार रद्द
यासह २१ वर्षाखालील तरुणी व ६५ वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या लाडक्या बहिणींचा लाभ रद्द करण्यात येणार आहे. महिला व बालकल्याण विभागाला शासनाकडून नुकतेच आदेश प्राप्त झाले असल्याची माहिती समोर आली आहे.