---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने नागरिकांना ऐन श्रावण महिन्यात ऑक्टोबर हीटचा अनुभव येत आहे. तसेच खरीप पिकांनी माना खाली टाकल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. दरम्यान, १४ ते १५ ऑगस्टपासून जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला असून, ही बातमी शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी आहे.
जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने नागरिकांना ऐन श्रावण महिन्यात ऑक्टोबर हीटचा अनुभव येत आहे. तसेच खरीप पिकांनी माना खाली टाकल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. दरम्यान, १४ ते १५ ऑगस्टपासून जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे ही बातमी शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी आहे.
आगामी पाच दिवसांचा पावसाचा अंदाज
आज बुधवारी काही अंशी ढगाळ वातावरण राहील, पण पावसाची शक्यता कमी आहे. गुरुवारी १४ ऑगस्ट रोजी ढगाळ वातावरणासह तापमानातही घट होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी १५ ऑगस्ट जी ढगाळ वातावरण, ठराविक तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. १६ ऑगस्ट रोजी दिवसभर ढगाळ वातावरण, मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज आहे. तर १७ ऑगस्ट रोजी दिवसभर ढगाळ वातावरण, मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज आहे.
तूट भरून काढणार
जिल्ह्यात १४ आणि १५ ऑगस्टपासून पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. दि. १६ व १७ ऑगस्ट रोजी मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. हा पाऊस जिल्ह्यातील पावसाची तूट भरून काढण्यास मदत करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.