Rohit Sharma : आता निवृत्ती विसराच…, रोहित शर्मा करणार जोरदार ‘कमबॅक’

---Advertisement---

 

Rohit Sharma : इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळल्यानंतर, आता टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. विशेषतः रोहित आणि विराटची ही शेवटची वनडे मालिका असणार असल्याची चर्चा रंगली आहे. अर्थात यानंतर दोघेही निवृत्ती घेतील, असे म्हटले जात आहे. या सर्व चर्चेदरम्यान रोहित शर्माने क्रिकेटच्या मैदानात पुनरागमनाची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे चर्चा करणाऱ्यांना ही चर्चा विसरावी लागणार आहे.

विशेषतः रोहित शर्माने अशा व्यक्तीकडून प्रशिक्षण घेत आहे, ज्याला नुकतेच टीम इंडियाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. अर्थात टीम इंडियाचे माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्यासोबत रोहित शर्मा सराव करताना दिसत आहे. रोहित शर्माने पोस्ट केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीवरून तो आता पुनरागमनाची तयारी करत असल्याचे उघड झाले आहे.

रोहित आणि विराट दोन्ही दिग्गजांनी टी-२० आणि कसोटी फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. आता हे दोन्ही दोन्ही दिग्गज फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसतील. रोहित शर्माने त्याची इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली, ज्यामध्ये तो अभिषेक नायरसोबत जिममध्ये दिसला. नायर आणि रोहित दोघेही चांगले मित्र आहेत.

नायरबद्दल बोलायचे झाले तर, अनेक खेळाडूंच्या यशात त्याचा मोठा हात आहे. त्याने दिनेश कार्तिक, रिंकू सिंग, केएल राहुलसोबत काम केले आहे. तो चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत भारताचा सहाय्यक प्रशिक्षक होता, पण नंतर त्याला काढून टाकण्यात आले. तथापि, इंग्लंड मालिकेपूर्वी त्याने केएल राहुलसोबत काम केले, ज्यानंतर त्याने ५३२ धावा केल्या.

आता अभिषेक शर्मासोबत रोहितची उपस्थिती हे सिद्ध करते की भारतीय एकदिवसीय कर्णधार अद्याप हार मानण्याच्या मनःस्थितीत नाही. रोहित कोणत्याही किंमतीत २०२७ चा विश्वचषक खेळू इच्छितो. तथापि, निवड समिती सध्या अशी इच्छा करते की फक्त तेच खेळाडू पन्नास षटकांच्या स्वरूपात खेळावे जे पुढील दोन वर्षे संघासोबत राहतील. अशा परिस्थितीत, शुभमन गिलला एकदिवसीय कर्णधार बनवण्याची मागणी देखील होत आहे. आता हे प्रकरण किती पुढे जाते हे पाहावे लागणार आहे.

---Advertisement---

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---