---Advertisement---
नंदुरबार : तळोदा तालुक्यातील कढेल येथील शेतकऱ्याचा वेलदा ता. निझर (गुजरात) येथे शेतात शॉक लागून मृत्यू झाला. ७ ऑगस्ट ही घटना घडली. सुभाष तुमडू पाटील (६७) रा. कढेल असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
सुभाष पाटील हे कढेल गावचे माजी सरपंच तथा प्रगतीशील शेतकरी म्हणून परिचित होते. सुभाष पाटील हे ७ ऑगस्ट रोजी दुपारी कढेल येथून वेलदार येथील शेतात उसाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते.
दरम्यान शेतावरून गेलेली वीज तार अचानक शॉर्टसर्किट होऊन तुटून पडली होती. या तारेला स्पर्श झाल्याने सुभाष पाटील यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर शेतात आग लागल्याचे दिसल्यानंतर मजूर व ग्रामस्थांनी धाव घेतली होती.
निझर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह ताब्यात देण्यात आला. सुभाष पाटील हे मार्क्सवादी काम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते तसेच पंचायत समितीचे माजी सदस्य आणि कढेल गावाचे माजी सरपंच होते. त्यांच्या मृत्यूने पंचक्रोशतीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.