---Advertisement---
Gold Price Today : सोने-चांदीच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. आज देशात २२ कॅरेट सोने दर प्रति १० ग्रॅम ९२,८९० रुपये आणि २४ कॅरेट सोने दर प्रति १० ग्रॅम १,०१,३४० रुपये पोहोचला आहे. दुसरीकडे, दुसरीकडे चांदीचा दर १,१४,९०० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सोने-चांदीच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद आणि कोलकाता सारख्या मोठ्या शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,०१,३४० रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९२,८९० रुपये आहे.
अहमदाबाद आणि पटनामध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,०१,३९० रुपये आहे आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९२,९४० रुपये आहे. जयपूरमध्ये, २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत १,०१,४९० रुपये आहे, तर त्याच ग्रॅमच्या २२ कॅरेट सोन्याची किंमत ९३,०४० रुपये आहे.