मध्यरात्री घरात घुसले अन् जावयाला केली बेदम मारहाण, सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल

---Advertisement---

 

पाचोरा : पत्नीसह सासू-सासऱ्याने व मेहुणीने मध्यरात्री घरात घुसून जावयाला मारहाण केली. ही घटना पाचोरा शहरातील बाबा नगर भागात घडली. याप्रकरणी पतीच्या फिर्यादीवरून पत्नी सासू-सासरे व मेहुणीविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

आकाश चव्हाण (३०) हे पत्नीसह घरी असताना १२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १:३० वाजेच्या सुमारास सासू-सासरे व मेहुणी आदी लोक घरी आले. यावेळी पत्नी निशा हिने पतीला सांगितले की, माझे आई-वडील व बहीण बाहेर आले आहेत.

दरवाजा उघडून पती बाहेर येताच सासू राधाबाई भगुरे हिने जावयाला खाली पाडले. सासरे रवींद्र यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी मेहुणी दीपाली धोंडे हिने देखील मारहाण केली.

यावेळी पत्नी निशा हिने सुरीने पतीच्या हातावर वार केला. सासू-सासरे आकाश याचा लहान मुलगा घेऊन पत्नी निशा हिच्यासह मध्यरात्रीच निघून गेले. आकाश चव्हाण याने याबाबत पाचोरा पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सासू-सासरे व मेहुणीविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---