Jalgaon News : तिरंगा फडकवा, पण ‘या’ चुका करू नका ; जाणून घ्या नियम

---Advertisement---

 

जळगाव : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू आहे. यात नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवता येतो. ध्वज सुरक्षित ठेवणे व त्याची योग्य पद्धतीने काळजीही घेणे आवश्यक आहे. ध्वज फडकवण्याचे व उतरवण्याचेही नियम आहे, त्यांचे योग्य पालन होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आज ध्वज फडकवण्याचे व उतरवण्याचे नियम जाणून घेऊया.

खरं तर तिरंगा ध्वज हा प्रत्येक भारतीयांचा राष्ट्राभिमान आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियानाद्वारे भारतातील प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवता येतो. यंदाही स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू आहे.

जाणून घेऊया नियम

ध्वज फडकवत असताना त्याची घडी अशी यावी की, फडकल्यानंतर केशरी रंग वर तर हिरवा रंग खाली आला पाहिजे. या शिवाय ध्वज उतरविल्यानंतर त्याची घडी सन्मानपूर्वक व व्यवस्थित घातली गेली पाहिजे.

ध्वजारोहण करताना तिरंग्याचा सन्मान सर्वात महत्त्वाचा आहे. कधीही फाटलेला अथवा खराब झालेला ध्वज लावू नये, तिरंगा कधीही उलटा फडकावू नये. तिरंग्याच्या आसपास इतर कोणताही ध्वज त्यापेक्षा उंच अथवा त्याच्याबरोबरीने लावलेला नसावा.

दररोज शासकीय कार्यालयांमध्ये तसेच ज्या-ज्या आस्थापनांवर तिरंगा ध्वज दररोज फडकवला व उतरविला जातो, तेथे सूर्योदयावेळी तो फडकवता येतो तर सूर्यास्तावेळी उतरविला पाहिजे. मात्र स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या दिवशी प्रत्येक कार्यालयात ध्वज फडकवण्याची सकाळी वेगवेगळी वेळ असते. मात्र, ध्वज उतरविताना तो सूर्यास्तावेळी उतरविलाच गेला पाहिजे.

तिरंग्याच्या दांड्यावर इतर कोणतीही वस्तू नसावी. केवळ ध्वजच त्यावर असावा. राष्ट्रध्वजाचा कोणत्याही कारणाने अवमान झाल्यास संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल होतो.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---