---Advertisement---
Sashidada Mahajan Passes Away : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जळगाव विभागाचे पूर्व जिल्हा संघचालक शशिदादा महाजन यांचे शुक्रवारी ( १५ ऑगस्ट २०२५) सकाळी १०. ०० वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी ४. ०० वाजता भालोद ता. यावल येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शशिदादा महाजन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध जबाबदाऱ्या मोठ्या यशस्वीपणे सांभळल्या होत्या. तसेच काही काळ त्यांनी विश्व हिंदू परिषदेचे देखील काम पाहिले. शांत, संयमी, शिस्तबद्ध अश्या स्वभावाचे ते उत्तम संघटक होते.
त्यांचा मोठा जनसंपर्क होता. संघ कार्यात त्यांचे मोठे योगदान होते, तर धार्मिक क्षेत्रातही त्यांचे कार्य अतुलनीय होते. शशिदादा महाजन यांच्या निधनामुळे एक मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या जाण्याने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.