Ajit Pawar : जळगावात ‘मुख्यमंत्री’ म्हणून झळकले अजित पवारांचे बॅनर!

---Advertisement---

 

जळगाव : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेले बॅनर आज जळगावात झळकले आहेत. या बॅनरवर ”दादा तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे, अशी विठोबा चरणी कार्यकर्त्यांकडून प्रार्थना” अशा ठळक आशयाचे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर झळकले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

निवडणुकीचा बिगुल फुंकणार ?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणे अपेक्षित असून, त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आघाडी घेत जळगावात बिगुल फुंकण्याची तयारी केली आहे. शनिवारी रात्री त्यांचे जळगाव विमानतळावर आगमण झाले होते. त्यांच्या उपस्थितीत आज मेळावा होणार आहे.

सर्व धर्मीय लाडक्या बहिणींनी बांधली राखी

जळगाव : राष्ट्रवादी अजित पवार गट महिला शक्तीकडून सर्व धर्मीय लाडक्या बहिणींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला. यावेळी महिला शक्ती गटाकडून सजग – सक्षम अभियानांतर्गत हेल्पलाइन नंबर चा शुभारंभ देखील करण्यात आला. या हेल्पलाइन नंबरद्वारे महिलांना आपल्या समस्या तक्रारी करता येणार आहे. तसेच विविध शासकीय कामाबाबतही या हेल्पलाइन नंबरद्वारे महिलांना माहिती मिळणार आहे.

धुळे, नंदुरबार व जळगावची आढावा बैठक

जळगाव : शहरातील राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयाला भेट दिली. या वेळी राष्ट्रवादीची धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली. माजी मंत्री अनिल पाटील, गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीला खान्देशातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---