---Advertisement---
Gold hallmark : सोन्याच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे ग्राहकांमध्ये कमी कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आता नऊ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांनाही अनिवार्य हॉलमार्किंगची मान्यता दिली आहे.
या निर्णयामुळे ग्राहकांना ३७.५ टक्के शुद्धतेचे सोने अधिक परवडणान्या दरात आणि प्रमाणपत्राच्या हमीसह उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत हॉलमार्किंगसाठी १४, १८, २२ आणि २४ कॅरेट सोनेच मान्य होते; मात्र आता ९ कॅरेटही अधिकृत यादीत समाविष्ट झाले आहे.
मिळाल्याने लाइट वेट आणि डिझायनर ज्वेलरीच्या श्रेणीत मागणी वाढेल. तरुण वर्गात ही संकल्पना लोकाय होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले.
महागाईमुळे सध्या सर्वसामान्य व मध्यमवर्गीयांचे जगणे कसरतीचे झाले आहे. त्यात सोन्या, चांदीचे भाव प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे सोने खरेदी करणे अवघड झाले आहे. त्यातच आता कमी कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढत असून या दागिन्यांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. हॉलमार्क प्रमाणपत्रासह शुद्धतेची खात्री आहे. दैनंदिन वापरासाठी दागिने हलके, मजबूत आणि टिकाऊ असल्याने ते पसंतीस ठरत आहेत.
ग्राहकांसाठी फायदे
परवडणारी किंमत असून उच्च कॅरेट सोन्याच्या तुलनेत कमी खर्च येतो. तसेच हे दागिने टिकाऊपणाला अधिक आहेत. कमी कॅरेटमुळे या दागिन्याचे धातू मजबूत आहेत. त्यामुळे डेली यूजसाठी ते सर्वांना योग्य आहेत.