अमळनेर बाजार समितीच्या काही संचालकांचा हायवेवर धिंगाणा

---Advertisement---

 

विक्की जाधव 
अमळनेर : बळीराजाशी जिव्हाळ्याचा विषय असलेली कृषी उत्पन्न बाजार समितीची धुरा चुकीच्या व्यक्तींकडे गेली आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याला कारणही तसेच आहे. बाजार समितीच्या संचालक मंडळातील काही जण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी हायवेच्या कडेला गाड्या लावून “रस्त्यावर चोरीचा मामला” सारख्या गाण्यांवर नाचत धिंगाणा घालत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

या संदर्भात त्यांच्याच जवळच्या कार्यकर्त्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर तरुण भारत लाईव्हला माहिती दिली आहे. शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा आव आणणाऱ्यांना याचे कुठलेच भान नसल्याचे दिसून आले. एका महिन्यापासून बैलजोडीच्या साजाचे दिलेले आश्वासन अद्याप अपूर्ण आहे. राजकीय मंडळी आणि काही पत्रकारांच्या जवळकीचा आधार घेत शेतकऱ्यांची फसवणूक झाकण्याचा प्रयत्न संचालक मंडळाकडून होतांना समोर येत आहे. संचाकल मंडळाकडून शेतकऱ्यांना असलेल्या अपेक्षांवर पाणी फेरले जात आहे. बाजार समितीच्या भवितव्याशी एका प्रक्रारे खेळ मांडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.


“जमिनीवर शेतकरी हवालदिल… हायवेवर संचालक बेभान!”

कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर ही शेतकऱ्यांची अस्मिता आहे. मात्र, अशा बेफिकीर नेतृत्वामुळे शेतकरी वर्गाची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. अमळनेरकरांनी आणि शेतकऱ्यांनी वेळीच डोळे उघडले नाहीत, तर या महत्त्वाच्या संस्थेचे भविष्य अंधारात जाणार यात शंका नाही. शेतकऱ्यांच्या नावाने मते घेणारेच आज शेतकऱ्यांच्या घामाशी बेईमानी करत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी हायवेच्या कडेला गाड्या लावून धिंगाणा घालत आहेत. 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---