---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यात पावसाचे जोरदार कमबॅक केले असून, गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात ९४ मिमी पाऊस झाला आहे. त्यात शनिवारी रात्री ते रविवारी सकाळपर्यंत एकूण ४५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. अशातच पुन्हा १८ व १९ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जिल्ह्यात ऑगस्ट महिना अर्धा संपत आल्यावर देखील जोरदार पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, दोन दिवसात जिल्ह्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. अनेक तालुक्यांमध्ये जोरदार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शनिवारी रात्री ते रविवारी सकाळपर्यंत एकूण ४५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
यलो अलर्ट जारी
जळगाव जिल्ह्यात अजून काही दिवस जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. १८ व १९ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान, जोरदार पावसासह ४० ते ५० किमी वेगाने जोरदार वारेही वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.