खळबळजनक ! चाळीसगाव शहरात नाल्यात वाहून आला मृतदेह

---Advertisement---

 

चाळीसगाव : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी धुळे रोड येथील महाराणा प्रताप चौक हॉटेल सावलीच्या पाठीमागे आज सोमवारी (18 ऑगस्ट) सकाळी सुमारे 8 ते 8.30 वाजे दरम्यान एक 40 ते 45 वर्ष वयोगटातील पुरुषाचा मृतदेह नाल्याच्या पाण्यात वाहून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. चाळीसगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.

नाल्यात वाहून आलेल्या व्यक्तीकडे काही कागदपत्रे सापडली आहेत. त्याच्याकडे आधार कार्ड आढळून आले आहे. या आधार कार्डवरून तो रांची, झारखंड येथील रहिवासी असल्याचे समजते. धुळे रोड परिसर हा शहरातील एक गजबजलेल्या भाग म्हणून ओळखला जातो. त्यातच नाल्यातून मृतदेह वाहून आल्याने या ठिकाणी बघ्यानी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

या व्यक्तीचा मृत्यू नैसर्गिक मृत्यू झाला आहे कि त्याचा घातपात करण्यात आला आहे याचा तपासाचे पोलिसापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित मनेल तसेच पीएसआय योगेश माळी, सायकर, दिलीप रोकडे फॉरेन्सिक टीम या ठिकाणी हजर झाले. यानंतर हा मृतदेह चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी हालवण्यात आला. पुढील तपास चाळीसगाव शहर पोलीस करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---