Leopard attack : तळोद्यात पुन्हा बिबट्याची दहशत, घोड्याचा पाडला फडशा

---Advertisement---

 

मनोज माळी
तळोदा :
शहरासह परिसरात पुन्हा बिबट्याची दहशत पसरली आहे. हातोडा रस्त्यावरील विधानगरी शेजारील (भारत ऑईल मिल) आवारात बिबट्याने घोड्याचा फडशा पाडला. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

सोमवार दिनांक १८ रोजी रात्रीच्या सुमारास पाडवी हट्टी येथील शैलेश विकास पाडवी हा त्याच्या घोड्याला भारत ऑईल परिसरात चारा पाणी करुन रात्री १२ वाजता घरी गेला. त्यानंतर बिबट्याने घोड्याची शिकार करून ठार मारल्याची घटना घडली.

भारत ऑईल मिलच्या आजुबाजूला विद्यानगरी कॉलनी, तसचे न्यायलय, उपजिल्हा रुग्नालय, समोर कृषीउत्पन बाजार समितीच्याबैल बाजार असल्याने बिबट्याचा हल्ला नागरी सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर ठरला आहे. आठ दिवसांपूर्वी दिनांक ९ ऑगस्ट रोजी तळोदा शहरापासून २ किलोमीटर अंतरावर काजीपूर तलावडी रस्त्याजवळ एका महिलेवर बिबट्याने हल्ला करुन गंभीर जखमी केले होते.

---Advertisement---

 

आमदार राजेश पाडवी यांनी घटनास्थळाची पाहणी करून वनविभागास बिबट् जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु अद्याप बिबट्या जेरबंद करण्यास वनविभागास सफलता मिळाली नसली तरी बिबट्या शिकारीसाठी सफल ठरतआहे.

वनविभागाला एक प्रकारे चॅलेंज

जंगलात वन्यजीव, हिंस्र प्राणी असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असतो परंतु नागरी वस्तीतही अगर वन्यजीवमुळे सुरक्षेचा धोका निर्माण होत असल्यास नागरिकांनी आता कुठे वास्तव्य करावे?असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तळोदा तालुक्यात आणि आता शहरात बिबट्याच्या मुक्त संचार वाढल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊन बिबट्याची दहशत वाढली आहे. मानव बिबट् संघर्षात सध्या तरी बिबट्या बाजी मारून नेत असल्याचे आहे. वन विभागाने विशेष मोहीम व आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बिबट्याच्या बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---