---Advertisement---
नंदुरबार : सोशल मीडिया ग्रुप तयार करून त्यात नफा झाल्याचे भासवत महिलेसह पाच जणांनी चार्टर्ड अकाउंटंटची तब्बल २० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात एका महिलेसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णा राजकुमार गांधी असे फसवणूक झालेल्या चार्टर्ड अकाउंटंटचे नाव आहे. एका सोशल मीडिया ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला होता. या ग्रुपला नफा झाल्याचे बनावट मेसेज शेअर करत संशयितांनी गांधी यांच्याकडे काही रकमेची मागणी केली.
गांधी यांनी आधी १९ लाख ५० हजार आणि नंतर ७५ हजार असे एकूण २० लाख २५ हजार रुपये भरले. परंतु परतावा न मिळाल्याने अखेर त्यांनी संबधितांना संपर्क केला. झाल्याचे परंतु संपर्क न झाल्याने फसवणूक समोर आल्यानंतर गांधी यांनी पोलिसांत धाव घेतली.
याप्रकरणी कृष्णा गांधी यांनी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून एका महिलेसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील करत आहे.