---Advertisement---
जळगाव : सर्पदंश झाल्याने ६० वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पारोळाच्या खेडीढोक येथे सोमवारी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास घडली ही घटना घडली. अशोक घुडकू पाटील (६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक घुडकू पाटील (६०, खेडीढोक) हे सोमवारी सकाळी ७वाजेच्या सुमारास गायींना चारापाणी करण्यासाठी गेले होते. ते सव्वानऊ वाजेच्या सुमारास घरी आले असता त्यांना चक्कर येऊ लागली. त्यावेळी त्यांच्या उजव्या पायाच्या पोटरीवर काहीतरी चावल्याच्या खुणा दिसत होत्या. त्यानंतर कुटीर रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले.
संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अशोक पाटील यांना विषारी साप चावल्याने त्यांना विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी पारोळा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस करत आहेत.