सेनापती रघुजी भोसले यांची २०० वर्षे जुनी तलवार मुंबईत दाखल

---Advertisement---

 


शूर योद्धे सेनापती रघुजी भोसले यांची प्रसिद्ध तलवार लंडनमध्ये होती. ती तलवार महाराष्ट्र सरकारने लिलावातून परत आणून एक ऐतिहासिक कार्य केले आहे. ही तलवार सोमवारी सकाळी मुंबईत आणण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचे वर्णन करतांना सांगितले की, भारताचा वारसा पुनर्संचयित करण्याचा हा प्रयत्न आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार म्हणाले की, सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर तलवार उतरवण्यात आली. त्यानंतर, ती कडक सुरक्षेत प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे अकादमीमध्ये ठेवण्यात आली.

ही ऐतिहासिक तलवार विमानतळावरुन अकादमीपर्यंत बाईक रॅलीचे आयोजन करुन आणण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, मुसळधार पाऊस आणि वाहतूक कोंडीमुळे हा कार्यक्रम रद्द करावा लागला.

तलवारीच्या आगमनानिमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ही केवळ एक शस्त्र नाही, तर मराठा साम्राज्याच्या शौर्याचे प्रतीक आहे. ते म्हणाले, “ही तलवार एका प्रकारे आपल्याकडून हिरावून घेण्यात आली होती आणि आता ती पुन्हा महाराष्ट्रात परत आली आहे. ती आपल्या भावी पिढ्यांना आपल्या इतिहासाशी आणि अभिमानाशी जोडण्याचे एक साधन बनेल.” फडणवीस यांनी यावेळी लिलावाची माहिती मिळताच सरकारने किती लवकर कारवाई केली याची आठवणीला उजाळा दिला.

महाराष्ट्र सरकारने ही तलवार ४७.१५ लाख रुपयांना विकत घेतली. १८१७ मध्ये सीताबर्डीच्या लढाईत जेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने नागपूरच्या भोसले राज्यकर्त्यांचा पराभव केला तेव्हा ही तलवार भारताबाहेर गेली असे इतिहासकारांचे मत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---