---Advertisement---
जळगाव : जिल्हयात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, भडगावच्या कजगावमध्ये चक्क एकाच रात्री चार घरफोड्या करून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.
घटनास्थळी पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांनी भेट देऊन पाहणी केली असता अज्ञात चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. स्वामी समर्थ परिसर, शंकर नगर या भागात दि.१८ च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चार घरे फोडत एका घरातून १५ ते २० हजारांचा ऐवज लांबविला इतर ठिकाणी खाली हाताने परतावे लागले. स्वामी समर्थ परिसरातील रहिवासी यशवंत उत्तम मोरे यांच्या घराचा कडीकोयंडा तोडत घरातील कपाट उघडून त्यातील १५ ते २० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला.
याठिकाणीही चोरट्यांनी साधला डाव, पण..
सागर दाभाडे यांचे बंद घर फोडत घरातील कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकून दिले. मात्र हाती काही न लागल्याने आपला मोर्चा शंकर नगरकडे वळविला. या ठिकाणी अजयसिंग पाटील यांचे घर फोडले. तेथून स्टेशन रोडवरील वर्धमान चोरडिया यांचे घर गाठले. मात्र, पावसामुळे दरवाजे फुगल्याने त्यांना उघडता आला नाही.