पुरात वाहिलेला इसम दुसऱ्या दिवशीही बेपत्ता; शोध सुरूच

---Advertisement---

 

जळगाव : नाल्याचा पूर पाहण्यासाठी गेलेला इसम पुराच्या पाण्यात तोल जाऊन पाय घसरल्याने वाहून गेला. ही घटना अमळनेरच्या पातोंडा-नांद्रीदरम्यान असलेल्या सुटावा लवण नाल्यावर घडली. हा इसम दुसऱ्या दिवशीही सापडला नसून, अद्यापही त्याचा शोध सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

अमळनेर तालुक्यातील पातोंडा-नांद्रीदरम्यान असलेल्या सुटावा लवण नाल्याचा पूर पाहण्यासाठी गेलेले सर्जेराव संतोष बिरारी (५५) पुराच्या पाण्यात तोल जाऊन पाय घसरल्याने वाहून गेले. हा इसम दुसऱ्या दिवशीही सापडला नाही.

ही घटना रविवार दुपारी १२ वाजता घडली होती. बिरारी हे रविवारी पूर पाहण्यासाठी गेले असता पाण्यात तोल जाऊन पडल्याने ते वाहत गेले होते. त्यानंतर ते बेपत्ता आहे. त्यांचा अद्यापही शोध लागलेला नाही.

दुसऱ्या दिवशीही सोमवारी सकाळ पासून परिसरातील लोकांनी व ज्यांना पोहता येते अशांनी शोध घेतला, मात्र संध्याकाळपर्यंत ते सापडले नाही. ग्रामस्थ, नातेवाईक शोध घेण्याचे प्रयत्न करीत आहेत. मात्र सुटवा नाल्यात जमलेला गाळ व नाल्यातच दोन्ही बाजूला काटेरी सुबाभूळ असल्याने शोधकार्यात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---