आरोपीची जामिनावर सुटका ; सोशल मीडियावरील पोस्ट तिघांना पडली महागात

---Advertisement---

 

धुळे : गुड्या खून प्रकरणातील आरोपी विक्रम गोयर उर्फ बाबा याची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्याचे उदात्तीकरण करणाऱ्या पोस्ट इन्स्टाग्रामवर करुन गुन्हेगारांचे उदात्तीकरण केल्याप्रकरणी फागणे येथील तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्यानंतर सायंकाळी सायबर पोलिस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल चेतन सोनगिरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला.

फागणे येथील विशाल दिलीप पाटील, बंटी नंदकिशोर पाटील (सर्व रा. फागणे) या तीन तरुणांनी सोशल मीडियावर विशेषतः इन्स्टाग्रामवर खून प्रकरणातील आरोपी विक्रम गोयरच्या समर्थनार्थ रील आणि पोस्ट अपलोड केल्या.

भूषण अनिल ठाकरे आणि नीलेश उर्फ या प्रकाराने समाजात चुकीचा संदेश जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोहेकॉ महेश मराठे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---