Nandurbar accident : दुचाकीवरून निघाले अन् मागून चारचाकी वाहनाने दिली धडक, पती-पत्नीसह मुलगा जखमी

---Advertisement---

 

नंदुरबार : म्हसावद ते धडगाव रस्त्यावर भरधाव वेगातील चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत पती-पत्नीसह मुलगा जखमी झाला. १३ ऑगस्ट रोजी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी म्हसावद पोलिस ठाण्यात एमएच १८ सीई ०३४४ वरील चालकाविरोधात गुन्हा दाखल आहे.

विशाल बिंद्या पवार हे पत्नी आरती यांच्यासह एम.एच. २८ ए.ए. ३०३३ दुचाकीने चिंचोरा गावातून जात असताना, धडगाव ते म्हसावद रस्त्यावर मागून आलेल्या एमएच १८ सीई ०३४४ या चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली.

धडकेत विशाल पवार यांच्या डोक्याला तर आरती यांच्या कमरेला दुखापत झाली. याप्रकरणी म्हसावद पोलिस ठाण्यात एमएच १८ सीई ०३४४ वरील चालकाविरोधात गुन्हा दाखल आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---