---Advertisement---
जळगाव : एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू, तर सात जण गंभीर झाले आहे. ही घटना भडगाव-पारोळा रस्त्यावर घडली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोयगावहून धुळ्याकडे जाणारी एसी बस (क्र. MH-14-BT-1984) आणि समोरून येणारा भरधाव ट्रक (क्र. MH-19-CY-1606) यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात पंकज पाटील (३०, उंदीरखेडा) यांचा जागीच मृत्यू, तर सात जण गंभीर झाले आहे. जखमींना पारोळा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने, त्यांना अन्य रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
या अपघातात रघुनाथ गणपंत सोनवणे (ढेकू), मिराबाई पंढरी सोनवणे (५५, सोयगाव), निलाबाई घनश्याम सिरसागर (७५, धुळे), अंजनाबाई रघुनाथ पाटील (७०, हनुमंत खेडा), मनोहर सजन पाटील (६०, चोरवड), रमेश धोंडू चौधरी (८०, भडगाव), मीराबाई रघुनाथ पाटील (८०, धुळे) आणि जानवी संतोष मोरे (१९, धुळे) आदी जखमी झाले असून, त्यांच्यावर पारोळा आणि भोले विघ्नहर्ता रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत, या प्रकरणी अधिक तपास सुरु केला आहे. काही जखमींची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे अधिकृत माहिती पोलीस तपासानंतर स्पष्ट होईल.