---Advertisement---
Asia Cup 2025 : टीम इंडियाचा वरिष्ठ खेळाडू अजिंक्य रहाणेने आशिया कप २०२५ पूर्वी सोशल मीडियावर त्याचा सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे.
रहाणेने त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये शुभमन गिल आणि अभिषेक शर्माला सलामीवीर म्हणून निवडले आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी त्याने जगातील नंबर २ टी-२० फलंदाज तिलक वर्मा यांना स्थान दिले आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव यांना चौथ्या क्रमांकावर आणि माजी उपकर्णधार आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या यांना पाचव्या क्रमांकावर स्थान देण्यात आले.
सहाव्या क्रमांकावर रहाणेने यष्टीरक्षक पर्याय म्हणून जितेश शर्माची निवड केली. जितेशने आयपीएल २०२५ मध्ये फिनिशर म्हणून चांगली कामगिरी केली, म्हणून त्याने संजूपेक्षा या खेळाडूला पसंती दिली. रहाणेने आणखी एक अष्टपैलू अक्षर पटेलला ७ व्या क्रमांकावर समाविष्ट केले. अक्षर अलीकडेच आयपीएल २०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना दिसला.
बॉलिंगमध्ये रहाणेने जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांना त्याचे आवडते वेगवान गोलंदाज म्हणून समाविष्ट केले. तो म्हणाला, ‘मला या आशिया कपमध्ये जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग एकत्र गोलंदाजी करताना पहायचे आहे.’ रहाणेच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मनोरंजक गोष्ट म्हणजे त्याने कुलदीप यादवचा समावेश केला आहे आणि त्याच्या मते वरुण चक्रवर्ती किंवा हर्षित राणा यापैकी फक्त एकच खेळेल.
राहाणेंची प्लेइंग इलेव्हन
शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती/हर्षित राणा.
संजू सॅमसन बाहेर का ?
संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवूनही रहाणेने त्याचे कौतुक केले. तो म्हणाला, ‘शुभमन आता संघात परतला आहे, मला वाटतं तो अभिषेक शर्मासोबत ओपनिंग करेल. वैयक्तिकरित्या, मला संजू सॅमसनला संघात पहायला आवडेल कारण त्याने चांगली कामगिरी केली आहे. तो एक उत्तम टीममन आहे. पण माझ्या मते, कदाचित संजू सॅमसनला बाहेर बसावे लागेल, जरी मी म्हटल्याप्रमाणे, मला तो खेळावा आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये असावा असे वाटते. पण शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा संघासाठी ओपनिंग करतील.’