---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. स्कूल बसचालक अबीद हुसेन शेख (वय, ४१ रा. शेंदुर्णी) याने एका १७ वर्षीय हिंदू अल्पवयीन शाळकरी मुलीचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत, तिला ब्लॅकमेल केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला असून, संबंधिताला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अबीद हुसेन शेख (वय, ४१ रा. शेंदुर्णी) हा शेंदुर्णी येथील एका शाळेत बसचालक म्हणून कार्यरत होता. दरम्यान, तो पीडित मुलीचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत, तिला ब्लॅकमेल करत होता. तसेच दबाव टाकून तिला शारीरिक संबंधासाठी भाग पाडत होता. या धमकीमुळे पीडिता कुणाला काही सांगत नव्हती मात्र, तिच्या वडिलांनी विचारल्यानंतर तिने संपूर्ण हकीकत सांगितली.
मोबाईलमध्ये आक्षेपार्ह फोटो
पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अबीद हुसेन शेख (वय, ४१ रा. शेंदुर्णी) याला ताब्यात घेऊन, पोलिसांनी चौकशी केली असता, त्याच्या मोबाईलमध्ये पीडितेचे काही आक्षेपार्ह फोटो आढळून आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
चार दिवसांची पोलीस कोठडी
या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करून विशेष पोक्सो न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर पीडितेच्या पुढील पुरवणी जबाबानंतर गुन्ह्यात वाढीव कलमे लावण्यात आली असून, न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पुढील तपास पाचोरा पोलीस करत आहेत.
सकल हिंदू समाज आक्रमक
या घटनेनंतर सकल हिंदू समाज आक्रमक झाला असून, आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी शेंदुर्णी येथे रविवारी सकाळी 8 वाजता सकल हिंदू समाजातर्फे भव्य मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. तरी सर्व हिंदू बांधव-भगिनींनी मोठया संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.