---Advertisement---
जळगाव : भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. शेतकऱ्याला शेतीकामात नेहमीच सर्जा राजा मदत करीत असतो. शेतकरी हा अशा सर्जा राजाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करीत असतो. ही कृतज्ञता दाखविण्यासाठी बैल पोळा हा सण साजरा करण्यात येतो. या दिवशी बैलांना पूर्णपणे आराम दिला जातो. त्यांची आंघोळ करुन करुन त्यांना सजविले जाते. त्यांच्या सिंगांना रंगकाम केले जाते. त्यांना विविध वस्तुंनी सजविले जाते.
पोळा हा सण शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. पोळा निमिताने घरात पुरण पोळीचा खास बेत केला जातो. सजविलेल्या सर्जा राजाचे पूजन केले जाते. त्यांना सप्त धान्यांचे नेवैद्य दाखविण्यात येत असते. अशाच प्रकारे डॉ. उल्हास पाटील कृषी व कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
पोळा सण साजरा करतांना गोदावरी फाउंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील यांच्या हस्ते सर्जाराजाचे पूजन करण्यात आला. त्यांना पुरणपोळी आणि सप्तधान्यांचा नैवेद्य खाऊ घालण्यात आला. याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, डॉ. वैभव पाटील, अनिल पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, कृषी महाविद्यालयाचे डॉ. अशोक चौधरी, डॉ. शैलेश तायडे, डॉ. पूनमचंद सपकाळे उपस्थित होते. तसेच कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि आयुर्वेद कॉलेजचे प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.