---Advertisement---
नशिराबाद : येथे अडीचशे वर्षाच्या परंपरेनुसार याही वर्षी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नशिराबाद गावाच्या पोळ्याचे विशेष म्हणजे या ठिकाणी बैलांची शर्यत लावली जाते आणि त्या शर्यतीमध्ये जो बैल गाव दरवाजामध्ये प्रथम येईल त्यास विजय घोषित करून बैल मालकास मानाचा फेटा व बैलास पुरणपोळीचा नैवेद्य देऊन सन्मानित केले जाते. यावर्षी लॅम्पी आजाराचे संकट असतानाही नशिराबादमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ठीक बारा वाजून पाच मिनिटांनी पीक संरक्षण सोसायटीचे अध्यक्ष डिगंबर जीवराम रोटे यांनी बंदुकीचा बार फोडून बैलांची शर्यत सुरुवात केली.
ही बैलांची शर्यत नशिराबाद वाकी नदीच्या पलीकडे असलेल्या ऐतिहासिक कल्याण बुरुजापासून ते विठ्ठल मंदिराजवळील गाव दरवाजापर्यंत असते. जो बैल बंदुकीच्या बार नंतर प्रथम गाव दरवाजात जो बैल येईल तो विजय घोषित केला जातो. याही वर्षी ही शर्यत मागील वर्षाची परंपरा राखत सलग दुसऱ्या वर्षी बाळू नारखेडे खालची आळी माळीवाडा यांच्या बैलाने जिंकली आणि सलग याही वर्षी मान मिळविला, त्यामुळे बैल मालक भारावून गेले होते. यावेळी परिसरातील नागरिकांनी एकच जल्लोष केला.
ढोल ताशाच्या गजरामध्ये विठ्ठल मंदिराच्या ओट्यावरती जि. प. माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, नशिराबादचे माजी सरपंच विकास पाटील, पंकज महाजन तसेच किरण पाटील विनोद रंधे, मुकुंदा रोटे, तुळशीराम येवले, चंदू पाटील, मनोज पाटील, गणेश नारखेडे, अरुण भोई, सोसायटीचे सदस्य व पोळा उत्सव समितीचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते. या पोळा सणाच्या निमित्ताने नशिराबाद नगरीला यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले होते. त्यात खास करून जळगाव जिल्ह्यातील तसेच विविध शहरांमध्ये नोकरीनिमित्त राहत असलेले गावातील मंडळी पोळापाण्यासाठी आलेले होते. पोळा फोडण्याच्या वेळी नशिराबाद पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सायंकाळी निघणार बाशिंग बैलांची मिरवणूक विजय झालेला बैल व त्याच्या साथीने अनेक गावातील बैल मालक आपापल्या बैल जोड्यांसह बैलांना बाशिंग बांधून मिरवणूक काढली. या मिरवणुकीमध्ये आनंदाने शेतकरी राजा आपल्या बैलांच्या आनंदामध्ये गुलालाची उधळण करून वाद्य वृद्धांच्या साथीने नृत्य सादर केले. नशिराबादचा पोळा हा जळगाव जिल्ह्यात विशेष ठरत आहे
शिवशंकर, हनुमान दर्शनाची परंपरा
सर्जाराजाचे पूजन, आरती करीत शेती अवजारांचे पूजन करण्यात आले. पुरणपोळीचा नैवेद्य देऊन बैलजोडींना भगवान शिवशंकर, हनुमान मंदिरात दर्शनासाठी नेण्यात परंपरा आहेत
खड्यांचा अडथळा
बैलपोळा शर्यंत मार्गावर खड्डे होते. नगर परिषदेने आदल्या दिवशी तात्पुरती मलमपट्टी करून बुजवलेले खड्डे, काही ठिकाणी पसरवला नसलेला मुरूम शर्यत मार्गावरती अडचणींचा ठरताना दिसून आला. त्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.