---Advertisement---
NCDC Recruitment : सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (NCDC) भरती जाहीर केली आहे. यात मुख्य संचालक आणि उप संचालक या पदांकरिता अर्ज मागविण्यात आली आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे या पदांसाठी निवड कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय केली जाणार आहे. या पदांवर उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे आणि मुलाखतीच्या आधारे थेट नोकरी मिळण्याची संधी मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे कारण त्यांना दीर्घ परीक्षांची तयारी करावी लागणार नाही.
मुख्य संचालक आणि उप संचालक या पदांसाठी अर्ज प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार NCDC ncdc.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2025 आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून MBA किंवा PGDM पदवी ही शैक्षणिक गुणवत्ता असणे गरजेचे आहे.
NCDC ने या पदांसाठी वयोमर्यादा ही पुढील प्रमाणे जाहीर केली आहे. मुख्य संचालक पदासाठी अर्ज करण्यासाठी कमाल वय ४५ वर्षे आहे. उपसंचालक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे.
उमेदवारांना अर्ज करण्यासाठी विहित शुल्क जमा करावे लागणार आहे. सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १२ ०० भरावे लागतील. तर एससी, एसटी, दिव्यांग आणि माजी सैनिक उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. शुल्क फक्त ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे.
मुख्य संचालक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना वेतन पातळी-१३ नुसार वेतन दिले जाणार आहे. जे दरमहा १,२३,१०० ते २,१५,९०० पर्यंत असणार आहे. तसेच उपसंचालक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना वेतन पातळी-११ नुसार वेतन दिले जाईल, जे दरमहा ६७,७०० ते २,०८,७०० पर्यंत असणार आहे.
या भरतीचे सर्वात मोठे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांची निवड लेखी परीक्षेशिवाय केली जाणार आहे. म्हणजेच महामंडळ थेट गुणवत्तेच्या आणि मुलाखतीच्या आधारे निवड करेल.