अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या ‘त्या’ स्कुल बस चालकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी

---Advertisement---

 

पाचोरा : पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत इ.१० वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर स्कूल बस चालकाने शेतात नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली असून याबाबत पिंपळगाव ( हरेश्वर)पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपीस पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या घटनेबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) हद्दीतील एका गावातील मुले, मुली हे शिक्षणासाठी जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे स्कूल बसने दररोज प्रवास करीत होते. यातील स्कूलबस चालक अबिद हुसेन शेख जलील (वय- ३८) ( रा.शेंदुर्णी ता. जामनेर) हा त्या खेड्यावरून मुलींना व मुलांना शेंदुर्णी येथील शाळेत दररोज घेऊन जात होता. यातील पीडित मुलगी ही अल्पवयीन असून इयत्ता दहावीची विद्यार्थिनी आहे.

‘तू मला खूप आवडतेस’ असे म्हणून आरोपी याने ‘त्या गावात मोटरसायकलने येऊन पीडित १७ वर्षीय बालिका शौचालयाला जाताना पाठलाग केला. तिचा हात धरला व विनयभंग केला. या प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

दरम्यान पीडीतेच्या पुरवणी जबाबात नमूद केल्यानुसार पिडीतेस आरोपी बसचालक याने जामनेर तालुक्यातील माळेगाव येथील सीताफळाच्या शेतात नेऊन अत्याचार केल्याचे कबूल केले आहे. तसेच पिडीतेला फोनवरून वारंवार धमकावणे व अश्लील बोलणे करीत पीडीतेचा छळ केला. यावरून आरोपी विरुद्ध पिंपळगाव ( हरेश्वर) पोलिसात अत्याचारासह पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान त्या खेड्यावरून ५० ते ६० विद्यार्थि, विद्यार्थिनी दररोज स्कूल बसने ये जा करीत होत्या. यातील अजून काही मुलींची ह्या बस चालकाने छेडछाड केली असल्याचा तपास पोलीस करीत आहे.

दोन वेगवेगळ्या धर्मातील हा गुन्हा असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. हा ‘लव जिहाद’चा प्रकार असल्याचे नमूद करीत हिंदू संघटना आक्रमक झाल्या असून आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे. याप्रकरणी तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांचे मार्गदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---