Chhagan Bhujbal : लाडक्या बहिणींना छगन भुजबळांचे आवाहन, वाचा नेमके काय म्हणाले

---Advertisement---

 

Chhagan Bhujbal चाळीसगाव : लाडक्या बहिणींना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय झाला त्यानंतर प्रत्येक जण निवडणुकीच्या संदर्भात गुंतलेले होते. त्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे जे राज्य शासनाचे वेतन घेत आहेत यासाठी पात्र नाही असे त्यावेळी नियम करून दिलेले होते. मात्र, त्यावेळी काही लोकांनी त्या नियमांचे पालन केलेलं नसल्याचे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. ते महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतीस्मारक लोकार्पण सोहळ्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते.

मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, प्रशासकीय अधिकारी ही निवडणुकीच्या कामांमध्ये व्यस्त असल्याने चुकीने काही लोक लाडकी बहीण योजनेत सहभागी झाले. निवडणुकीनंतर मी स्वतःहून सांगितलं की ज्या भगिनींचं नाव नियमात बसत नाही त्यांनी काढून घ्यावं , आणि त्यांच्याविरुद्ध काहीही कारवाई करू नये. मात्र या योजनेमध्ये पुरुषांनीही अर्ज भरले असतील तर ते मात्र शिक्षेला पात्र आहेत.

अजूनही मी हे सांगेल की, ज्या भगिनी नियमात बसत नाही, तुम्ही स्वतःहून माघार घेतली पाहिजे कारण त्यांना इतर सवलती मिळत आहेत. आता या संदर्भात माहिती घेण्याचं काम सुरू आहे नियमात न बसणाऱ्या अजूनही काही भगिनी त्यात सापडतील असा दावा त्यांनी यावेळी केला.

मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आंदोलन करणार आहे. त्यामुळे पुन्हा संघर्ष होण्याची चिन्ह आहे. मात्र संघर्ष कोणाबरोबर होणार ? 54% ओबीसी आहेत , बिहारमध्ये जातगणना झाली 63% ओबीसी संख्या निघाली , 54% च्या अर्ध आम्हाला आरक्षण मिळायला हवं. ओबीसी मध्ये 374 जाती आहेत , देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दहा टक्के वेगळे आरक्षण दिलं आहे. आणि ते आरक्षण आम्ही वाचवणार यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. विद्यार्थ्यांसाठी त्यांना ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या सारथीच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत.

ओबीसीन पेक्षाही जास्त गोष्टी सार्थीच्या माध्यमातून त्यांना देण्यात आलेले आहेत. उगाच गर्दीमध्ये तुम्हाला काही भेटणार नाही आणि आम्हालाही अडचण होईल. मात्र जरांगे कशासाठी हे सर्व करतात हे मला माहिती नाही. पण ओबीसीच्या बाबतीत जरांगे काही म्हणत असतील तर आमचं म्हणणं हेच राहील. कारण चार आयोगाने त्यांना नाही म्हणून सांगितलं , सुप्रीम कोर्टाने ही 80 पानांचा जजमेंट दिलं की मराठा समाज ओबीसीमध्ये येऊ शकत नाही. याच्या पलीकडे महाराष्ट्र सरकार जाऊ शकत नाही. ओबीसीच्या आरक्षणांमधून कोणी आरक्षण मागण्याचा प्रयत्न करत असेल तर ओबीसी समाजही जागृत आहे.

छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या मतांमध्ये घोळ वक्तव्याबाबत स्पष्ट केले की, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही सुद्धा हे सांगतो की निवडणुकीच्या अगोदर आपल्या मतदार यादी तपासून घ्या. मतदान याद्या तपासायला मुदत दिलेली असते त्यावर आपण हरकती नोंदवू शकतो. हे काम जो आहे आता प्रत्येक पक्ष करत आहे.

उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला बोगस जनता पार्टी असे म्हटले असल्याचा प्रश्न विचारला असता छगन भुजबळ यांनी लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं सत्ताधारी पक्षावर टीका करण्याचं काम आहे. सत्ताधारी पक्ष हे ऐकत असते. कुणाचा खरं कुणाचं खोटं हे जनता ठरवत असते. तक्रारी या निवडणुकीच्या अगोदर करावा लागतात निवडणूक झाल्यावर नाही असा टोला त्यांनी लगविला.

निवडणुकीच्या अगोदर तक्रारी आल्या असतील तर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याच्यावर तात्काळ कारवाई करायला पाहिजे

मी मुंबईच्या महानगरपालिकेपासून 57- 58 वर्षे निवडणुका लढवल्या, मी नेहमी बघत आलेलो आहे यामध्ये नको ते घुसलेले असतात. ज्यांना उभं राहायचं आहे त्यांनी त्याच्यावर जास्त लक्ष ठेवलं पाहिजे. 14-15 कोटी लोकांची नावे त्यामुळे काही वेळेला काही लोक गडबड करत असतील आपण जागृत होऊन ते थांबवलं पाहिजे.

सुप्रिया सुळे यांनी माझ्या पांडुरंगाला मटन खाल्लेले चालतं असे वक्तव्य केले आहे, छगन भुजबळ यांनी त्याचे समर्थन करीत सांगितले की, माझं स्वतःचं हे मत आहे की सरकारने हे ठरवण्याची आवश्यकता नाही. मी म्हटलं वापरावी किंवा नाही शर्ट इन करावी की नाही , काय खावं, काय प्यावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे हा त्यांच्यावर सोडून दिला पाहिजे.

छगन भुजबळ यांना शालार्थ बोगस आयडी बाबत प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, ज्यांनी चुकीचं केलं असेल त्यांच्यावरती कारवाई होणार.

मुंबईत कबूतर पेटा कायद्याबाबत बॅनर बाजी सुरु आहे. यावर उत्तर देतांना छगन भुजबळ म्हणाले की, मी लहानपणापासून मुंबईत राहत होतो. कबूतर खाणे तेव्हापासून मुंबईत आहेत. मात्र त्यावेळी लोकसंख्या कमी होती व कबूतर देखील कमी होते. मात्र मोठमोठ्या इमारती मुंबई झालेले आहेत आणि कबुतरांमुळे अनेक रोगांना आमंत्रण दिल जात आहे, असे मोठ्या डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे माणसं जपायचे की कबूतर जपायचे ही ठरवण्याची वेळ आली आहे.

छगन भुजबळ यांना नाशिक पालकमंत्री पदबाबत सुरु असेलल्या विवादा संदर्भांत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, पालकमंत्री पदाबाबत गिरीश महाजन काय म्हणाले हे मला माहिती नाही. गिरीश महाजन कार्यक्रमाला येथील तेव्हा त्यांना विचारा असे सल्ला दिला. कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांची नियुक्ती झाली आहे. पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्री घेतात ते याबाबत निर्णय घेतील असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री पदासाठी मी दावा करत नाही मात्र सर्वसाधारण महायुतीमध्ये जी पद्धती आहे. कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या सहकारी पक्षाचे किती आमदार, मंत्री आहे. त्याचे वाटप याचा विचार करून पालकमंत्री पद दिल्या जातात. नाशिक जिल्ह्यात आपलेपण सात लोक आहेत. हे अजित दादांना आम्ही सांगू. याचा सुद्धा विचार करा.

याबाबत अजित पवारांना सांगितल्यावर अजित दादा मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करतील. पालकमंत्री पद दिल्यास आपल्याला आवडेल असे डुबली प्रश्न माझ्या आयुष्यात खूप पहिले. माझ्या मनात फक्त अजित दादांना सांगणं आहे योग्य वेळ आल्यावर मी सांगेल

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---