---Advertisement---
Jalgaon Dengue Update : जोरदार पावसामुळे जळगाव जिल्ह्यात साथरोगाचे रुग्ण वाढले आहेत. त्यातच जिल्ह्यातून चाचणीसाठी पाठविण्यात आलेल्या २८३ नमुन्यांपैकी २७ रुग्णांना डेंग्यूची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या २२ दिवसात ३९ जणांना डेंग्यू झाल्याचे जिल्हा हिवताप विभागाकडून सांगण्यात येत आहे.
एकट्या जामनेर तालुक्यात ४, अमळनेर-२, चाळीसगाव- १५, भुसावळ २, बोदवड, रावेर, चोपडा, आणि जळगाव शहरात प्रत्येकी एका रुग्णाला डेंग्यू झाल्याचे निदान करण्यात आले. हिवताप विभागाकडून त्वरीत चाळीसगाव शहरासह तालुक्यात जामनेर तालुक्यातील ज्या गावात रुग्ण आढळून आले आहेत. त्या रुग्णांच्या गावात डास शोध मोहिम राबविण्यात आली.
जीएमसीत तिघांवर उपचार
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात साधारणत ३६६ जणांचे रक्तांचे नमुने तपासण्यात आले. यात ३ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तिघांवर जीएमसीत उपचार सुरु आहे.
दरम्यान, नागरीकांनी घरासभोवताली पाणी साचणार नाही. अशी व्यवस्था करावी जेणेकरून डासांची उत्पत्ती होणार नाही. त्यातच डेंग्यूची लक्षणे दिसून आल्यास त्वरीत शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जळगाव जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांनी केले आहे.
काय आहेत लक्षणे ?
डोळ्यांच्या खोबणीत वेदना, तीव्र डोकेदुखी, अंगावर पुरळ येणे, सांधेदुखी, भूक मंदावणे, उलट्यातून रक्त येणे, उलट्या होणे, रक्तमिश्रित काळसर संडास होणी, तोंडाला कोरड पडणे ही डेंग्यू तापाची लक्षणे आहेत.