---Advertisement---
शेंदुर्णी, ता. जामनेर : दहावीतील विद्यार्थिनीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ विविध संघटनांच्यावतीने शेंदुर्णी येथे मूक मोर्चा काढण्यात आला आणि संशयित आणि त्याला मदत करणारी त्याची आई यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणी संशयित अबिद हुसेन शेख जलील (३८) आणि त्याची आई फातिमाबी शेख जलील (६१, दोन्ही शेंदुर्णी) यांना अटक करण्यात आली आहे. यावेळी बजरंग दलाचे सहसंयोजक प्रा. आशिष दुसाने (पुणे) व लिना मनोज चव्हाण यांनी भाषणात मार्गदर्शन केले.
विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री भिका इंदरकर यांनी प्रास्ताविकात निवेदनातील मागण्यांचे वाचन केले. मोर्चात सहभागी महिलांनी निवेदन पोलिस उपअधीक्षक अरुण आव्हाड, पहूरचे सपोनि प्रमोद कठोरे, शेंदुर्णी दूरक्षेत्रचे उपनिरीक्षक नंदकुमार शिंद्रे यांना देण्यात आले. याप्रसंगी हजारोच्या संख्येने हिंदू महिला व बांधव उपस्थित होते.
अन्यथा सरकारला तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल…
प्रखर वक्ते बजरंग दलाचे सहसंयोजक प्रमुख वक्ते प्रा. आशिष दुसाने यांनी जमावाला मार्गदर्शन केले. लव जिहादविरोधात महाराष्ट्र सरकारने कठोर कायदा करावा, संबंधित खटला हा फास्टट्रॅक कोर्टात चालवून त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी. अन्यथा हिंदू समाजाच्या तीव्र रोषाला महाराष्ट्र सरकारला सामोरे जावे लागेल, असे आव्हानदेखील त्यांनी दिले.
पाचोरा विभाग पोलीस उपविभागीय अधिकारी आव्हाड, पहूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रमोद कठोरे व आधी पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन लवकरात लवकर संबंधित व्यक्तीला फाशीची शिक्षा व्हावी व पीडितेला न्याय द्यावा, अशी मागणी सकल हिंदू समाजाच्यावतीने करण्यात आली. संपूर्ण मोर्चा शांततेच्या मार्गाने पार पडला.