---Advertisement---
Jalgaon Gold Rate : गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. कालच्या तुलनेत आज, मंगळवारी सोन्याचा भाव ५०० रुपये प्रति तोळ्याने वाढून होऊन १,००,८०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर दुसरीकडे चांदी दर मात्र स्थिर आहे.
जळगावमध्ये आज २४ कॅरेट सोने दर १००,८०० (जीएसटीसह १०,३८२४) रुपये प्रति १० झाला आहे. २२ कॅरेट सोने दरात ३६० रुपयांनी वाढ होऊन ९२,३३० रुपये झाला आहे.
दिल्ली, जयपूर, नोएडा, गाझियाबाद आणि लखनऊमध्ये २४ कॅरेट सोने १,००,९०० रुपये प्रति १० ग्रॅम दराने आहे. तर २२ कॅरेट सोने ९३,७०० रुपयांना उपलब्ध आहे.
चेन्नई, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू आणि पटनामध्ये २४ कॅरेट सोने १,००,८०० रुपये प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट सोने ९३,६०० रुपये प्रति १० ग्रॅम दराने आहे. म्हणजेच, आज बहुतेक ठिकाणी सोने महाग झाले असून, गुंतवणूकदारांनी ते सुरक्षित गुंतवणूक म्हणून खरेदी केले आहे.