चोरट्यांनी लढवली अजब शक्कल, मुलाला फिट आल्याचे सांगत दोन लाखांची रोकड केली लंपास

---Advertisement---

 

पाचोरा : जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यातच पाचोरा येथे एका सेवानिवृत्त शिक्षकाची दिशाभूल करीत नाट्यमय पद्धतीने दोन लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. हासर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून पुढील तपास पाचोरा पोलीस करीत आहेत.

पाचोरा शहरातील नूराणी नगर भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. एका मुख्याध्यापकांनी शाळेसाठी संगणक खरेदीसाठी आणि बांधकाम मिस्त्रीला देण्यासाठी दोन लाख रुपये स्थानिक जेडीसीसी बँकेतून काढले होते. ही रक्कम त्यांनी सेवानिवृत्त शिक्षक शेख खलिल शेख नुरा यांच्या ताब्यात दिली. शेख खलिल यांनी ही रोकड आपल्या मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवली आणि घराकडे रवाना झाले .

---Advertisement---

 

घरी पोहचल्यावर त्यांनी आपल्या घराच्या कंपाऊंडमध्ये मोटारसायकल लावली. तेव्हढ्यात एक लहान मुलगा रस्त्यावर चक्कर येऊन खाली पडला. त्या मुलाने आपणास फिट आल्याचा अभिनय केला. मुलाला चक्कर आल्याचे पाहून खालील शेख यांनी कोणताही विचार न करता त्या मुलाकडे मदत करण्याच्या उद्देशाने धाव घेतली. त्याचवेळी या गोंधळात त्यांच्या मोटारसायकलला चावी लावलेली राहिली होती.

ते मुलाला मदत करीत असतांना तेथे मोटारसायकलींवरुन दोघेजण आले. यावेळी त्यांनी खाली उतरुन खालील शेख यांना ‘मुलाला पाणी द्या’ असे सुचविले. त्यांचे ऐकून खालील शेख पाणी आणण्यासाठी घरात गेले. या संधीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी डिक्कीतील दोन लाखांची रोकड काढून घेत तेथून मोटारसायकलवरुन पळ काढला.

ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पाचोरा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन देशमुख आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---