---Advertisement---
एरंडोल : शिरपूर तालुक्यातील दहिवद येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर कठोर कारवाई करुन त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी भील समाज विकास मंचतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात निवेदन पोलिस निरीक्षकांना देण्यात आले.
निवेदनात शिरपूर तालुक्यातील दहिवद येथील एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन बाळा ऊर्फ अनिल किरोभा काळे (वय २८ याने अत्याचार केला आहे. या अत्याचारामुळे मुलीची तब्येत गंभीर असल्याचे म्हटले आहे. या आरोपी विरुद्ध अपहरण, अत्याचार अशा गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल करुन एस.सी.एस.टी अत्याचार प्रतिबंधक कायदा ,पॉक्सो कायदा अंतर्गत कायदेशीर कारवाई करून सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्या.
त्याची २४ तासांच्या आत वैद्यकीय तपासणी करा, पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी, मानसिक आधार,संरक्षण उपलब्ध करुन द्यावे, पीडित कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत व पुनर्वसनाची सुविधा उपलब्ध करुन आदिवासी भागात सुरक्षा व्यवस्था वाढवून महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात याव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर भील समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख दिपक अहिरे,सोशल मीडिया प्रमुख सागर वाघ, तालुकाध्यक्ष भैया मोरे, युवा तालुकाध्यक्ष निहाल सोनवणे, कैलास मालचे, राजधर मोरे, राहुल मोरे, चेतन मोरे, हेमराज वाघ, दिपक सुर्यवंशी, रामदास पवार, हिरालाल सोनवणे, मधुकर सोनवणे, आबा गायकवाड, प्रथमेश ब्रिजलाल, शांताराम ठाकरे,धनराज पवार, भोला मालचे, विशाल मालचे, राहुल मोरे, दादू सोनवणे, बादल ठाकरे, समीर मालचे, अभय मोरे, सागर मोरे, दिपक सोनवणे, विजय सोनवणे, शिवदास सोनवणे, बाबा सोनवणे, प्रथम गायकवाड आदींच्या सह्या आहेत.