भुसावळात नियमित कचरा संकलनाचा अभाव, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

---Advertisement---

 

भुसावळ : शहरात नियमित कचरा उचलला जात नसल्याने कचऱ्यांचा दुर्गंधी येत असून या भागातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. तसेच नगरपालिकेमध्ये कचरा संकलन साठी 51 घंटागाड्य कार्यरत आहे. तरीसुद्धा जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नगरपालिकेचा कचरा संकलन आणि साफसफाईचा ठेका सह्याद्री कंट्रक्शन नाशिक यांना दिलेला आहे.

नगरपालिकेचा कचरा संकलनासाठी कंत्राटदाराला महिन्याला पन्नास लाख रुपये, म्हणजेच वर्षाला तब्बल 6 कोटी रुपये दिले जात जातात. शहरात स्वच्छतेचा अभाव असून नागरिकांना कचऱ्याच्या समस्येने ग्रासले आहे. तसेच शहरातील काही भागांमध्ये उघड्यावर मास विक्री केली जात असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन सीइओ यांना देण्यात आले आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहे. डेंग्यू , मलेरिया या सारखे भयंकर रोगराई पसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संध्याकाळी डासांचे थवे पहायला मिळतात. कचरा संकलन करण्यासाठी कंत्राटानुसार दररोज प्रत्येक प्रभागात कचरा घंटा गाडी येणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात कचरा गाडी तीन ते चार दिवसांनी किंवा त्याहूनही अधिक उशिराने येत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

घरासमोर साचलेल्या कचऱ्यामुळे आणि दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले असून अनेक नागरिक नाइलाजाने उघड्यावर कचरा फेकण्यास मजबूर झाले आहेत. यामुळे शहरात अस्वच्छतेची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कंत्राटदाराला कोट्यवधी रुपये देऊनही भुसावळ शहरात मूलभूत सुविधा पुरवण्यात नगरपालिका अपयश आल्याचे स्पष्ट दिसत आहे.

या गंभीर प्रकाराबाबत वरिष्ठ स्तरावरून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. नागरिक नियमितपणे घरपट्टी आणि पाणीपट्टी भरत असतानाही त्यांना कचऱ्याच्या समस्येशी सामना करावा लागत आहे. या सर्व त्रासातून नागरिकांची कधी सुटका होणार, असा सवाल आता भुसावळ नागरिक नगरपालिकेला विचारत आहेत. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून योग्य ती पाऊले उचलावीत, अशी मागणी भुसावळकर करीत आहेत.

याबाबत संबंधित अधिकाऱ्याला विचारले असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तर देऊन अर्धवट माहिती दिली. ठेकेदाराचा मोबाईल नंबर मागितला असता दिला नाही. तुम्हाला काय ते मला सांगा अशी माहिती आरोग्य विभाग व पाणीपुरवठा अधिकारी दिपक चौधरी यांनी दिली.

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा

भुसावळ शहरातील शिवशक्ती हुडको कॉलनी, रानातल्या महादेव मंदीरच्या परिसराला लागून राष्ट्रीय महामार्ग या सर्वीस रोड आहे. या सर्विस रोडवर मास मटन विक्री करणारे लोक हे आपले उरलेले खराब मास रस्त्यावर टाकतात. त्यामुळे त्या भागात कुत्राचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे परिसरात रोगराई वाढली आहे.

मास खाल्याने भटकी कुत्री ही मासाळलेली आहे व तेथुन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा चावा घेतात. आबालवृद्धांच्या अंगावर धावून येतात. भटक्या कुत्र्यांच्या भीतीने लहान मुलांना फिरणे अश्यक्य झाले आहे. मास मटन विक्री करणारे कोणतीही प्रक्रीया न करता सरळ रस्त्याच्या बाजूला उरलेले मटण टाकून देतात. नगर परिषदने दिलेल्या नियमांच पालन न करता सदर मास उघड्यावर फेकले जाते. हे मास विक्रेते त्यांना दिलेल्या परवान्याचे उल्लघन करीत आहेत.

नगर परिषदेने दिलेल्या कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराला मास जमा करण्याबाबतची अट टाकण्यात आली आहे. परंतु, सफाई कामगार सुद्धा रस्त्यावर पडलेले मासचा कचरा उचलत नाही. यामुळे नागरिकांचे येथे खूप मोठ्या प्रमाणात हात होत आहेत. मास विक्रत्यांवर कारवाई करण्यात यावी व व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे यावी असे निवेदन परिसरातील नागरिका मंगेश पाटील, वैशाली देशमुख, हेमलता महाले , रमेश सोनवणे , सुलभा पाटील, योगेश दोडे आदी 25 नागरिकांनी नगरपालिका सिओ यांना लेखी निवेदन दिलेले आहे

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---