Honor killing : विवाहित मुलीच्या घरी पोहोचला प्रियकर, वडिलांना माहित पडलं अन्… सर्वत्र उडाली खळबळ

---Advertisement---

 

Honor killing नांदेड : एक विवाहिता तिच्या प्रेमींसोबत सासरच्या मंडळींना नको त्या अवस्थेत आढळून आली. त्यांना याची चीड येऊन त्यांनी थेट मुलीच्या वडिलांना याबाबत सर्वकाही कळविले. मुलीच्या वडील, काका आणि आजोबांनी यांनी तिचे सासर गाठले. सासरकडील मंडळींनी मुलीला सोबत ठेवण्यास नकार देत झाला सर्व प्रकार सांगितला.

मुलीच्या वडिलांनी लागलीच मुलगी व तिच्या प्रियकराला सोबत घेत तिचे सासर सोडले. मुलीने केलेल्या कृत्याने वडिलांचा राग अनावर झाला होता. त्याने आपल्या विवाहित मुलीसह तिच्या प्रियकराची हत्या केली. या हत्याकांडाने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मुलीच्या वडिलांनी मुलीचे व तिच्या प्रियकराचे हातपाय बांधले. यानंतर त्या दोघांना विहिरीत फेकून दिले. या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांना खबर मिळताच मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. यानंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांसह तिघांना अटक केली आहे. आरोपींमध्ये वडील तसेच मृताचे काका आणि आजोबा यांचा समावेश आहे.

नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील करकला शिवरात ही घटना घडली आहे. मरण पावलेल्यांची नावे संजीवनी सुधाकर कामले (वय १९ वर्षे) आणि लखन बालीजी भंडारे (वय १९ वर्षे) अशी आहेत. मृत मुलगी संजीवनी हिचे लग्न झाले होते. तर लखन अविवाहित होता. संजीवनीचे लखनशी प्रेमसंबंध होते. सोमवारी लखन तिच्या सासरच्या घरी तिला भेटण्यासाठी गेला होता. त्यानंतर सासरच्यांनी संजीवनी आणि लखनला आक्षेपार्ह परिस्थितीत पकडले.

यानंतर रागावलेल्या सासरच्या मंडळींनी संजीवनीचे वडील मारुती सुराणे यांना बोलावून घेतले. मुलीच्या प्रेमप्रकरणाची माहिती मारुतीला कळताच ते लगेच मुलीच्या सासरी पोहोचले. यावेळी त्यांना संजीवनी आणि लखनच्या प्रेमप्रकरणाची माहिती देण्यात आली. यानंतर सासरकडील मंडळींनी संजीवनीला माहेरी परत पाठवून दिले. यावेळी आम्हाला तुमच्या मुलीची गरज नसून तिला माहेरी घेऊन जा असे स्पष्टपणे सांगतिले. हे ऐकल्यानंतर सांजवानीच्या वडिलांनी तिला व तिच्या प्रियकराला सोबत घेऊन गावाकडे निघाले. त्यांच्यासोबत मुलीचे काका आणि आजोबा देखील होते.

---Advertisement---

 

या घडलेल्या प्रकरणाने मुलीचे वडील संतप्त झाले होते. त्यांनी संतप्त होत संजीवनी आणि तिचा प्रियकर लखन यांचे हातपाय बांधले. यानंतर त्या दोघांना विहिरीत फेकून दिले, यामुळे त्यांचा मृत्यू झाला. नंतर, मुलीचे वडील स्वतः पोलिस स्टेशनला हजर होऊन आपला गुन्हा कबूल केला. यानंतर, पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी विहिरीजवळ घटनास्थळी पोहोचून रात्री १२ वाजेपर्यंत मुलगी आणि तिच्या प्रियकराचे मृतदेह बाहेर काढले. या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---